नमस्कार,
'कैकाडी वधू-वर सूचक मंडळ ' मध्ये आपले हार्दिक स्वागत !
कैकाडी जातीबद्दल माहिती
आपल्या जाती बद्दल सध्याच्या काळात काही साहित्यकरांनी बरेच लिखाण केले आहे. १९४८ साली नंतर हैदराबाद मधून ( निजामशाहीतील पाच जिल्हे वेगळे करून त्याचा मराठवाडा विभाग झाला.) इसवी सन पूर्व सातव्या सहस्त्रकात आर्य, कझाकस्थान , मगोलिया, सायबेरिया , या प्रांतातून स्थलांतरित होऊन, मेहरगढ परिसरात आले असल्याचे ऐतिहासिक पुरावे संशोधनात मिळालेले आहेत. आर्यांनी क्षत्रिय लोंकांमध्ये जातिभेद निर्माण करून आपला स्वार्थ साधला, अखेरच्या क्षणापर्यंत लढणार्या क्षत्रियांना गावाबाहेर ढकलले. त्यांना वाळीत टाकले. इतरांना शेतकरी व बलुतेदार केले.यातूनच कैकाडी जातीचा जन्म झाला.काही क्षत्रीय जंगलात दर्याल-खोर्यातत राहून आपली उपजीविका करू लागले. टोळीटोळीने जंगलात भटकंती करू लागले. त्यांची वेगळी सांकेतिक भाषा तयार झाली. त्यातूनच कैकाडी जातीचा जन्म झालेला दिसतो.कै म्हणजे हात,काडी म्हणजे झाडाच्या फांदी ,यापासून विणकाम करणारे कैकाडी॰
महाराष्ट्रातील कैकाडी व त्यांच्या उपजात :
मुख्य जात कैकाडी –
ही जात गावं शेजारी व गावात राहून झाडाच्या फांदीचे फोक तयार करून कणगी ,पाट्या,टोपल्या,झाप,खुराडी,इत्यादी नग तयार करून शेतकरी वर्गाला विकून मोबदल्यात अन्नधान्य व पैसे घेत असत,त्यांना गाव कैकाडी म्हणतात.काही ठिकाणी बजंत्रीचा व्यवसाय पण करतात.गाढव यांचे वाहतुकीचे सर्वात मोठे साधन आहे.
उपजाती -
धोंतले , टगारी , पातरूट घंटिवाले , भामटे , चोर कैकाडी .
माकडवले –
माकडाचा खेळ करून आपली उपजीविका भागविणारा समाज.
पामलोर –
सापाचा खेळ करून उपजीविका भागविणारा समाज.
वरील जातीत एकमेकात रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत.प्रत्येक जातीचे आपापली जाती संस्था, बोलीभाषा, रीतीरिवाज, जात पंचायत ही वेगवेगळी आहे.
कैकाडी जातीची माहिती
गाव कैकाडी-कुळ –
याचे दोन कुळ (पिढी) आहेत.एक सातपडी कावाडी. ह्या मुख्य दोन कुळामध्ये त्यांच्यात आप-आपापल्यात उपकुळ भरपूर आहेत. बेटी व्यवहार साटपाडी व कावाडी या दोनच पिढीत होतात. आप आपल्या कुळात बेटी व्यवहार होत नाहीत. सातपाडी कुळात जन्म घेतलेली मुलगी कावाडी कुळात दिली जाते व कावाडी जातीत जन्म घेतलेली मुलगी सातपाडी समाजात दिली जाते.ह्यामुळे गांव कैकाडी समाजात अजूनही पवित्र बंधने पाळले जातात. त्यामुळे समाजात प्रेमभाव, बंधूपणा, सोयरे व आपलेपणा टिकून आ हे॰
भाषा –
कैकाडी समाजाची बोली भाषा वेगळी आहे. त्यांची स्वतःची सांकेतिक भाषा वेगळी आहे. त्या भाषेत तेलगू, कन्नड, केरळा, तामिळ असा मिश्र भाषेचा संग्रह आहे.या भाषेला लिपि नाही. म्हणूनच तिला सांकेतिक भाषा म्हणतात. प्रत्येक जिल्हयावर भाषातीच , पण उच्चार वेगवेगळे,काही ठिकाणी तेलगू भाषेचा प्रभाव:तर काही ठिकाणी कन्नड (कर्नाटक) भाषेचा प्रभाव
व्यवसाय –
मूळ व्यवसाय विणकाम करणे.विंकामासाठी ,बांबू,शिंदीचे फोक,निर्गुडी,पिंचुडी,कापसचे,टंटनीचे फोक ज्याच्यापासून टोपली,कणगी,धुराडी,झाप कुरकुली बनविले जातात.ह्या धंद्याला म्हणावे तसा बाजार नाही.परंतु वरील सर्व वस्तु शेतकरी वर्गाला उपयोगी असत.मोबदल्यात शेतकरी वर्ग धन्य देत असत,तर काही जण पैसे.हा व्यवसाय सालाचे बाराही महीने चालतो.सुगीच्या दिवसात चांगली कमाई होते.घरात अन्नधान्य भरपूर येते.कैकाडी जातीचे काही गावे आपापली बांधिलकी असते.एकाच्या गावाला दुसर्यााने पाटी-टोपली विकायची नाही.शेतकरी वर्ग सुद्धा आपला कैकाडी सोडून दुसर्याककडे वस्तु खरेदी करीत नसत.तसे काही घडल्यास भांडण तंटा होत असे व कधी कधी त्याचे रूपांतर ओक(जाती पंचायत)मध्ये होत असे.म्हणून भीतीच्या पोटी कोणी कैकाडी दुसर्यारच्या गावातील शेतकरी यांना आपले नग देत नसत. त्यामुळे आपापसात चांगळेपणाची भावना निर्माण होत असे.सर्व कुटुंब गुण्या-गोविंदाने राहत असत.
पाळीव प्राणी –
गाढव, कुत्रा व डुक्कर हे तीन प्राणी कैकाडी पाळत असत. गाढवांच उपयोग माल वाहतुकीसाठी एका गावाहून दुसर्या गावी स्वतःच्या घराचे ओझे वाहण्यासाठी तसेच काही लोक गाढवाचे दूध पण विकत असत.हे दूध लहान मुलासाठी गुणकारी आहे.गाढव दिवसभर चरण्यासाठी सोडून द्यायचे व संध्याकाळी आपल्या घरी आणून दावणीला बांधून ठेवायचे.
लग्न पद्धत –
मुला-मुलींची लग्न लहानपणीच ठरवून पार पडली जात असत .(पण आता ही पद्धत बदलली आहे.) कवडी व सातपाडी या दोन कुळामद्धे सोयरीक होते.पूर्वी शिंदीचे ग्लास पित पित सोयरीक बोलणी करायची.तेथे जे शब्द एकमेकांना दिले जयचे ते शब्द अंतिम ठरविले जात आसत.त्यामध्ये समाजाचे अनेक लोक असे.त्याला जांब धरणे असे म्हणतात.(सोयरीक पक्की झाली)म्हणजे दूसरा कोणी मागणी घालत.
जात पंचायत –
जात पंच्यात ही कैकाडी समाजाची स्वतंत्र न्यायसंस्था आहे.समाजातील पंच लोकांनी दिलेला न्याय हे वादी प्रतिवादी दोघांना मान्य करावा लागे. आजही जातीतील न्याय संस्थेला महत्व आहे.वादी प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकूनच न्यायनिवाडा करतात.
जात पंचायतीये प्रकार –
ज्या गावात वरील पैकी एखादी घटना घडली असल्यास त्यांनी आपआपल्या पाहुणे मंडळींना बोलवून घेऊन झालेला वृतांत त्यांच्या समोर कथन करतात,जरी ही मंडळी पाहुणे असली तरी, समाजाचे पंच म्हणून बैठकीला बसतात. बैठक गावाच्या बाहेर एखाद्या झाडाखाली बसते. बैठकीला घरातील चतुर व चाणक्य बायकांना सुदधा बसण्याची परवानगी असते॰
प्रकार दूसरा–
पहिल्या प्रकरणात पंचांनी दिलेला न्याय वादी प्रतिवादिंना मान्य न झाल्यास तेथेच वादी प्रतिवादी चिप्पा कई (रुपया टाकणे) टाकतात. म्हणजेच तुमचं न्याय आम्हाला मान्य नाही.परपेटला(म्हणजेच दुसर्याक गावी ) स्थान द्या. तेव्हा पंच लोक दोघांनी टाकलेले चिप्पा कई (रुपया) उचलून घेतात व वादी प्रतिवादीला सणात ईप्प तन तनाद कैदर तंगो म्हणजे तुम्ही दोघांनी आपापला जामीनदार पंचांसमोर द्या. तेव्हा वादी व प्रतिवादी आप आपले जामीनदार पंचासमोर द्या. तेव्हा वादी व प्रतिवादी आपापले जामीनदार पंचांच्या हवाली, त्यांचे हात धरून कळवितात,त्याला कैदारू म्हणतात.